New Harsul Development: नवीन हर्सूलचा विस्तार; पण सुविधांचा अभाव; गुंठेवारीचा तिढा, दूषित पाणी, कचरा डेपोची दुर्गंधी अन् चिखलमय रस्त्यांनी नागरिक त्रस्त

New Harsul Expands Rapidly but Civic Amenities Lag Behind: नवीन हर्सूलमध्ये झपाट्याने नागरीकरण होत असताना गुंठेवारीचा प्रश्न, दूषित बोअरवेलचे पाणी, कचरा प्रक्रिया प्रकल्पाची दुर्गंधी आणि चिखलमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत.
New Harsul Development

New Harsul Development

esakal

Updated on

हर्सूल: नवीन हर्सूल परिसरात झपाट्याने बांधकामे वाढत असून, नवनवीन वसाहती उभ्या राहत आहेत. मात्र, वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची परवड सुरू आहे. अनेक मालमत्तांची गुंठेवारी अद्याप झालेली नसून, गुंठेवारी करून घेण्याची नागरिकांची तयारी असतानाही महापालिकेकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची तक्रार नागरिकांनी ‘सकाळ’कडे समस्या मांडताना केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com