छत्रपती संभाजीनगर - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज झाले. शासनाने यावर्षी वाइन शॉप, बीअर शॉपी बुधवारी (ता. ३१) रात्री एकपर्यंत तर बार, हॉटेल, परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली..दरवर्षीच्या स्वागतासाठी काही हॉटेलमध्ये बल्क बुकिंगसाठी सवलत दिली. त्याच बरोबर काही ठिकाणी थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी विशेष व्यवस्था, सजावट केली. काहींनी जेवण, काहींनी ड्रिंकवर चकणा तर काही कंपन्यांनी वेगवेगळे गिफ्ट दिले आहेत. त्यातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीचे प्रयत्न केले गेले जात आहेत. काही हॉटेल चालकांनी एक दिवसाचा परवाना मिळावे यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केल्याची माहिती या विभागाचे अभिनव बालुरे यांनी दिली..पोलिसांचे ६७ ठिकाणी चेकपोस्टपोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेनुसार कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून ६७ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी उपनिरीक्षकासह पाच पोलिस कर्मचारी, शस्त्रधारी जवानही तैनात राहणार आहेत..दुपारी चारपासून ते दुसऱ्या दिवसाच्या पहाटे पाचपर्यंत हा बंदोबस्त असेल, असे विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले. ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’चे पथकही तैनात राहणार आहे. हर्सूल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड नाका, दौलताबाद टी-पॉइंट आणि वाळूज नाका अशा सात महत्त्वाच्या चौकांत बॅरिकेडिंग करून वाहनांची तपासणी केली जाईल..शासनाने यावर्षी पहाटे पाचपर्यंत बसून दारू पिण्याच्या हॉटेल, बार, रेस्टॉरंटच्या, परमिट रूम व अन्य आस्थापनांना परवानगी दिली. मात्र, याचा लाभ सर्वाधिक मेट्रो सिटीमध्ये होतो. आपल्या शहरासह अन्य छोट्या शहरात याचा फारसा लाभ होत नाही. पण, या निर्णयामुळे रात्री उशिरापर्यंत नववर्षाचा आनंद घेता येईल.- शिवाजी मनगटे, अध्यक्ष, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.