
Chh. Sambhajinagar Tourism
sakal
छत्रपती संभाजीनगर : मिटमिटा भागात १०० एकरांवर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकसित करण्यात येणाऱ्या नव्या प्राणिसंग्रहालयातील सिव्हिलची कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी दिले. रस्त्याचे काम अडविणाऱ्या शेतकऱ्यासोबत त्यांनी यावेळी संवाद साधला.