गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नऊ भरारी पथके; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

जिल्ह्यातील गर्दीचे होणार चित्रीकरण
sunil chavan
sunil chavansakal

औरंगाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा(aurangabad corona update) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. असे असताना नागरिकांकडून कोरोना नियमांचे(covid rules) पालन होत नाही. शिवाय अनेक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात १ या प्रमाणे नऊ भरारी पथकांची नियुक्ती करुण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पथकांद्वारे गर्दीच्या ठिकाणचे चित्रीकरण करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (collector sunil chavan)यांनी दिली.

sunil chavan
भाजपचे मूक आंदोलन; पाहा व्हिडिओ

जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रादेशिक प्रमुखांची आढावा बैठक शनिवारी (ता. ८) रात्री घेण्यात आली. यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, डॉ. भारत कदम, प्रभोदय मुळे, संगीता सानप, संगीता चव्हाण, उपविभागीय अधिकारी रोडगे, स्वप्नील मोरे, विधाते तसेच सर्व तालुक्यांचे तहसीलदार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पथकांच्या माध्यमातून मंगल कार्यालय, हॉटेल्स, भाजी मंडई आदी ठिकाणांवर लक्ष ठेवल्या जाणार आहे. शिवाय भरारी पथकांच्या माध्यमातून गर्दीचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

sunil chavan
औरंगाबादमध्ये गुजरातमधील मोठ्या पतंगांची ‘क्रेझ’

दिवसा जमावबंदी तर रात्री कर्फ्यू

जिल्ह्यात सकाळी ५ ते रात्री ११ वाजेर्यंत जमावबंदी लागू राहील. रात्री ११ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू राहणार आहे. या नव्या नियमावलीसह मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर या त्रिसूत्रीचे आजपासून सर्वत्र पालन करावे लागणार आहे. अन्यथा व्यावसायिकांसह नागरिकांवर कडक कारवाई होईल. लसीचे दोन डोस घेलेल्यांनाच प्रवास करता येईल. खासगी कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, सिनेमागृहात ५० टक्के उपस्थिती आणि दोन लस नसलेले कामगार, ग्राहक आढळले तर कारवाई केली जाणार आहे.

आजपासून जिल्ह्यात कठोर निर्बंध

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. यात दिवसा जमावबंदी तर रात्री कर्फ्यू राहणार आहे. त्यासोबतच हॉटेल, रेस्टॉरंट, बार, दुकाने रात्री १० वाजताच बंद होणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी रविवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र होणार आहे. नियमावलींचे पालन न केल्यास कठोर कारवाईला सामारे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com