औरंगाबादमध्ये गुजरातमधील मोठ्या पतंगांची ‘क्रेझ’

एक ते सहा फुटांपर्यंतच्या पतंगांचा समावेश
aurnagabad
aurnagabadsakal

औरंगाबाद : अवघ्या सात दिवसावर येऊन ठेपलेल्या मक्ररसंक्रांतीच्या(makarsankrant festival) सणानिमित्तीने बाजारपेठा सजल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून नायलॉनच्या मांजावर बंदी आल्याने आता त्याला मैदानी मांजा हा पर्याय बाजारात आला आहे. गुजरातमधील प्रसिध्द मोठ्या(gujarat kites) आकाराचे पतंग आता शहरात दिसू लागले आहेत. जवळपास एक ते सहा फुटांचे हे पतंग विक्रीसाठी बाजारपेठेत आले असून याला ग्राहकांची मोठी मागणी असल्याची माहिती पतंग विक्रेते विजय मकरिये यांनी शनिवारी (ता.८) सांगितले.

aurnagabad
नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरोधात धडक कारवाई

दरवर्षी संक्रातीला मोठ्या प्रमाणावर पतंग उत्सव(Kite festival) साजरा करण्यात येतो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा सण साध्या पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. यंदाही काही निर्बंध आले आहेत, असे असले तरी आठवड्याभरापूर्वीच पतंग खरेदीसाठी बाजार पेठेत गर्दी होत आहे. गुजरात मधील अमहदाबाद(ahmedabad) येथील उडविण्यात येणारे मोठे पतंग आता विक्रीसाठी शहरात आले आहे. यात कपड्याचे नवे पतंग असून हे आकर्षक आणि मोठ्या आकाराचे पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेतात. ७० रुपयापासून ते ७०० रुपयांपर्यंत हे विक्री होत आहेत. यात प्रामुख्याने मोर, मिकी माऊस, फिश, डॉलफिन, बार्बी, हत्ती याचे मोठ्या आकाराचे पतंग आहेत यालाच सर्वजण मागणी करीत आहेत. याचा वेगळा लूकही असतो. यासोबत येणारा मैदानी मांजा मागणी होत असल्याचेही श्री. मकरिये यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com