esakal | कोरोनाच्या दुसऱ्या डोससाठी तब्बल नव्वद हजारांची ‘वेटिंग’ !
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

कोरोनाच्या दुसऱ्या डोससाठी तब्बल नव्वद हजारांची ‘वेटिंग’ !

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसींचा (Corona Vaccination) तुटवडा कायम असल्याने शहरातील दुसऱ्या लसीसाठी वेटिंगवर असलेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी (ता.२२) महापालिकेला सात हजार लसी मिळाल्या होत्या. असे असले तरी दुसऱ्या डोससाठी अद्याप सुमारे ९० हजार नागरिक वेटिंगवर आहेत. दरम्यान, गुरुवारी ३९ केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली. नागरिकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अवघ्या चार तासांत लस संपली. कोरोना प्रतिबंधक लसींचा गेल्या महिन्यापासून तुटवडा आहे. महापालिकेला (Aurangabad Municipal Corporation) आठवड्यासाठी पाच-दहा हजार लसी मिळत आहेत. त्यामुळे लस उपलब्ध होताच लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या लांबच-लांब रांगा लागत आहेत. महापालिकेला गुरुवारी पाच दिवसानंतर सात हजार लसी मिळाल्या. त्यानुसार ३९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती.(nineteen thousand people awaits second dose of corona vaccination in aurangabad glp88)

हेही वाचा: लातुरात रिक्षावर झाड कोसळले अन् रिक्षाचालकाचा मृत्यू

त्यात दुसऱ्या डोससाठी ३४ केंद्रे ठेवण्यात आले होते. लस आल्याची माहिती मिळताच सकाळपासून कुपन घेण्यासाठी (Corona) गर्दी केली. प्रत्येक केंद्राला दीडशे लसीचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे अवघ्या चार तासात लस संपली. पहिला डोस घेण्यासाठी को-विन अ‍ॅपवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना पाच केंद्रावर लस देण्यात आली. दिवसभरात सुमारे सहा हजार आठशे लस संपल्या. त्यामुळे शुक्रवारी (ता.२३) शिल्लक लसीतून लसीकरण केले जाईल. त्यासाठी एखादे केंद्र सुरू ठेवले जाईल, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितले.

loading image