esakal | प्रकल्पांत सध्‍या ९० टक्के जलसाठा, मराठवाड्यातील चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

Tavraja Dam Ausa

मराठवाड्यातील ८७६ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ९० टक्क्‍यांवर आला आहे. ७५२ लघुप्रकल्पांपैकी सहा कोरडे झाले.

प्रकल्पांत सध्‍या ९० टक्के जलसाठा, मराठवाड्यातील चित्र

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ९० टक्क्‍यांवर आला आहे. ७५२ लघुप्रकल्पांपैकी सहा कोरडे झाले. १८ लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. यंदा चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्याची ही स्थिती आहे.मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत ९७.२० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. सिनाकोळेगाव प्रकल्प सध्या तुडुंब आहे. जायकवाडी धरणात ९८ टक्‍के, येलदरी ९९ के, सिद्धेश्‍वर ७३, माजलगाव ९८, मांजरा ९९, ऊर्ध्व पेनगंगा ९७, निम्न तेरणा ९८. निम्न मनार ९०, विष्णुपुरी ९०, निम्न दुधना प्रकल्पात ९७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे.

७५ मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत ९५ टक्‍के, जालन्यातील सात प्रकल्पात ९८, बीडमधील १६ प्रकल्पांत ९३, लातूरमधील ८ प्रकल्पांत ६४, उस्मानाबादेतील १७ प्रकल्पांत ८९, नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत ९१ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. ७५२ लघुप्रकल्पांपैकी लातूरमधील ४ तर बीड व औरंगाबादमधील प्रत्येकी एक असे सहा प्रकल्प कोरडे पडले आहेत. दुसरीकडे औरंगाबादमधील तीन, जालना, बीड, उस्मानाबादमधील प्रत्येकी चार, लातूरमधील दोन व नांदेडमधील एक प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९६ लघुप्रकल्पांत ७३ टक्‍के, जालन्यातील ५७ प्रकल्पांत ७१, बीडमधील १२६ प्रकल्पांत ८५, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ७४, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत ६४, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ८५ टक्‍के, परभणीमधील २२ प्रकल्पांत ८३ तर हिंगोलीमधील २६ लघुप्रकल्पांत ८८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. ६७ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ७५ टक्‍क्‍यांपुढे तर ५५८ लघुप्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ७५ टक्‍क्‍यांपुढे आहे. ६ मध्यम प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍के, २ मध्यम प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, ८३ लघुप्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के, ५५ लघुप्रकल्पांत २५ ते ५० टक्‍के, ३२ लघुप्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.


मोठे, मध्यम, लघुप्रकल्पांची संख्या
औरंगाबाद : ११३
जालना : ६४
बीड : १४४
लातूर : १४०
उस्मानाबाद : २२४
नांदेड : १००
परभणी : २६
हिंगोली : २७

Edited - Ganesh Pitekar