esakal | रस्त्याची बोंब! रुग्णालयात नेण्यापूर्वीच महिलेने दिला बाळाला जन्म | Aurangabad Updates
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेने बाळाला जन्म दिला

रस्त्याची बोंब! रुग्णालयात नेण्यापूर्वीच महिलेने दिला बाळाला जन्म

sakal_logo
By
अनिल गाभूड

विहामांडवा (जि.औरंगाबाद) : केकत जळगाव (ता.पैठण) (Paithan) येथील भगवान नगर वस्तीवर येथील एका महिलेला रूग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रस्त्यातच महिलेची प्रसुती झाल्याची घटना शनिवारी (ता.२) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली. कोमल सोमनाथ थोरे असे त्या महिलेचे नाव आहे. या विषयी सविस्तर माहीती अशी की, केकत जळगाव येथील भगवान नगरवस्तीवरील कोमल थोरे यांना सकाळी प्रसूती वेदना व्हायला लागल्या. पोट दुखत असल्याने दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता व्यवस्थित नव्हता. शुक्रवारी रात्री रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला आहे. भगवान नगर येथील ग्रामस्थ व महिला नेहमी गावात येण्यासाठी पायीच (Aurangabad) प्रवास करतात. तसेच एखाद्या आजारी व्यक्तीला रूग्णालयात न्यावयाचे झाल्यास बैलगाडीतून न्यावे लागते. परिणामी आजारी माणसाला दवाखान्यापर्यंत नेणे जिकरीचे होऊन बसते.

हेही वाचा: पावसामुळे कर्ज फेडायचं कसं या चिंतेतून शेतकरी महिलेची आत्महत्या

शनिवारी (ता.दोन) सकाळी येथील कोमल थोरे या गर्भवती महिलेला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. परंतु इतक्या सकाळी पायवाटेने आणि आडवाटेने दवाखान्यापर्यंत नेणार कसे हा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. अखेर बैलगाडीतून हा एक ते दीड किलोमीटर वाट पार करायची होती. परंतु , या महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली. वाटेतच प्रसुती झाल्याने महिलेस मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. दरम्यान, या वस्तीवर तीस - पस्तीस कुटुंब राहत असुनही या नागरिकांपर्यंत रस्ता पोहोचला नाही. त्यामुळे या वस्तीवरील गरोदर मातांची व रुग्णांच्या समस्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना रस्त्याची प्रतीक्षा कायम आहे. या रस्त्याअभावी गरोदर महिलांचे व रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. रस्तेच नसल्याने त्याचा फटका आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.

loading image
go to top