esakal | ना पाणी, ना रस्ते फक्त उद्‍घाटन सरकारच्या हस्ते
sakal

बोलून बातमी शोधा

सुहास दाशरथे

ना पाणी, ना रस्ते फक्त उद्‍घाटन सरकारच्या हस्ते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद ः शहरासाठी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांना जाब विचारून मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी गुरुवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत दिला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेनेकडून जनतेला पाणीपुरवठा योजेनेचे फक्त गाजर दाखवले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

सुहास दाशरथे म्हणाले, १६८० कोटीची नवीन पाणी पुरवठा योजना ही फसवी आहे. केवळ योजनेची घोषणा करून नागरिकांची फसवणूक शिवसेनेकडून केली जात आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या अनेक विभागांच्या परवानग्याच अद्याप मिळालेल्या नाहीत. आगामी महापालिकेची निवडणूक पाहता जनतेच्या डोळ्यात नुसती धूळफेक सुरु आहे. २०-२५ वर्ष महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने आपले अपयश झाकण्यासाठी केवळ योजनांची घोषणा करून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे.

हेही वाचा: 'खासदार इम्तियाज जलील यांनी राजकारण करु नये'; पाहा व्हिडिओ

योजनेसाठी शासनाचा ७० टक्के तर ३० टक्के म्हणजे ५०४ कोटी रुपये महानगरपालिकेला भरावे लागणार आहेत. ते अद्याप भरण्यात आलेले नाहीत, किंवा हा पैसा कुठून आणणार याचे उत्तर देखील सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल. पाणी योजनेसाठी करण्यात आलेला करार देखील फसवा आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा जाब आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारणार आहोत. शहराला पाणी कसे देणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे आवाहन करत मनसेने आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. प्रसंगी सुमीत खांबेकर, गजन गौडा पाटील, अशिष सुरडकर, अशोक पवार, संदीप कुलकर्णी, विशाल विराळे पाटील आदी उपस्थित होते.

loading image
go to top