
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी किल्ल्यावर मंगळवारी आग लागली होती. यात पक्षी आणि वन्यप्राणी जखमी आणि मृत झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे वन विभागाने बुधवारी (ता. नऊ) आणि गुरुवारी (ता. दहा) ‘मॅन विथ इंडीज’ संस्थेच्या मदतीने ड्रोनद्वारे पाहणी केली. यामध्ये एकही पक्षी आणि प्राणी जखमी किंवा मृत अवस्थेत आढळून आला नाही. उलट ३१ प्रजातींचे पक्षी, तीन वन्यप्राणी मुक्तविहार करताना आढळले, अशी माहिती वन विभागाने दिली.