
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शाळांमध्ये आता शिक्षकांप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही भरती ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातूनच होणार असल्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. रफीक झकेरिया कॅम्पस येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत यासंदर्भात ही माहिती देण्यात आली.