चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SIKANDAR

पोलिसांनी त्याच्या शहरातील बायकोचे घर गाठून चौकशी सुरू केली. ही बाब त्याला समजली तेव्हा तो हताश झाला. "तिला सोडून द्या मी शरण येतो; पण मी गुन्हा केलेला नाही' असा संदेश त्याने इतरांमार्फत पोलिसांना दिला होता. याचदरम्यान तो नगरच्या बायकोला भेटायला 18 जानेवारीला आला. त्याची खबर औरंगाबाद व नगर पोलिसांनाही लागली. मोठ्या शिताफीने त्याला तेथून पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेत औरंगाबादेत आणले. 

चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 

औरंगाबाद : राज्यभर घरफोड्या करून हैदोस घालणाऱ्या अट्टल चोरास एक, दोन नव्हे तब्बल चार बायका. त्यात नगरची सर्वांत प्रिय. तिला भेटायला तो गेला, तेव्हा पोलिसांना खबर लागली. त्यांनी सापळाही रचला; पण पोलिसांच्या वाहनाला धडक देत तो निसटला. नंतर दुसऱ्या सापळ्यात अडकला. या घरफोड्याने औरंगाबादेतील घरफोडीनंतर बायकोच्या बॅंक खात्यात तब्बल 14 लाख रुपयेही वळते केले होते. 

सय्यद सिकंदर सय्सद अख्तर कुख्यात व घरफोडीत सक्रिय आहे. त्याला चार बायका असून, एक बीडला, दुसरी औरंगाबादच्या पडेगाव भागात, तिसरी जालना येथे व चौथी नगरमध्ये राहते. यातील सर्वांत प्रिय बायको त्याची नगरची असल्याचे पोलिस सांगतात.

त्याने 28 ते 29 डिसेंबरदरम्यान सिडको एन-चारमध्ये निवृत्त डॉक्‍टरचे घर फोडून 14 लाख 98 हजारांचा ऐवज लांबविला होता. या तपासाचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. रेकॉर्डवरील घरफोड्यांची चौकशी केली. तेव्हा सिकंदर शहरातून गायब असल्याचे पुढे आले.

त्याचे लोकेशन काढण्यात आले. तेव्हा तो शहराबाहेर पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्याने चोरी केली असावी का हेही स्पष्ट नव्हते; पण संशय त्याच्यावर होताच. म्हणून पोलिसांनी घटनास्थळी वारंवार भेट दिली. सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर त्याच्या शहरातील बायकोचे घर गाठून चौकशी सुरू केली. ही बाब त्याला समजली तेव्हा तो हताश झाला.

"तिला सोडून द्या मी शरण येतो; पण मी गुन्हा केलेला नाही' असा संदेश त्याने इतरांमार्फत पोलिसांना दिला होता. याचदरम्यान तो नगरच्या बायकोला भेटायला 18 जानेवारीला आला. त्याची खबर औरंगाबाद व नगर पोलिसांनाही लागली. मोठ्या शिताफीने त्याला तेथून पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेत औरंगाबादेत आणले. 

बॅंक अधिकाऱ्यांनाही दिली होती कल्पना 
सिकंदरच्या चार बायकांपैकी दोघींचे खाते बॅंकेत होते. सिकंदरनेच चोरी केली हे सांगता येत नव्हते; पण जर त्याने केलीच तर तो शरण येण्यापूर्वी बायकोच्या खात्यावर चोरीची लाखोंची रक्कम जमा करू शकतो याचा अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे त्यांनी आधीच बॅंक अधिकाऱ्यांना या खात्यांवर नजर ठेवण्याचे सांगत ते सीजही केले. 

खात्यातून काढले पन्नास हजार 
पोलिसांनी चौकशी केली तेव्हा 14 लाख रुपये सिकंदरच्या पत्नीच्या खात्यात जमा होते. डॉक्‍टरच्या घरातूनही लंपास झालेली रक्कम जवळपास एवढीच होती.

यावरून त्यानेच चोरी केली याची खात्री पटली आणि पोलिसांनी ट्रान्झॅक्‍शनच्या ठिकाणाचे लोकेशन घेत त्याचा माग काढला. बायकोच्या खात्यात सिकंदरने पैसे टाकले; पण एटीएम मात्र सिकंदरकडे होते. त्याद्वारे तो खर्चासाठी पैसे काढीत होता. हे खाते बॅंक अधिकाऱ्यांमार्फत पोलिसांनी सील केले. 

नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

टॅग्स :NashikBeed