
अभिजितने विश्वास संपादन करण्यासाठी बनावट आरआरसी रिएक्टर प्रोजेक्ट तयार केल्याचे समोर आले. तसेच घरातच कलर प्रिंटरद्वारे बनावट कागदपत्रे तो तयार करीत होता. त्याच्याकडे तीन ते चारडजनच्या जवळपास कोरे कार्ड सापडले आहेत.
नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता "तो' प्रकार!
औरंगाबाद : नासाच्या प्रकल्पात गुंतवणूकीतून अमाप परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या संशयित अभिजित पानसरेने नाशिकच्या एका तरुणीला नासात नोकरी लागल्याचे फेक अपॉइंटमेंट लेटर दिल्याची बाब समोर आली आहे. सुमारे 28 जणांना या संशयिताने गंडविले.
पण नाशिकच्या तरुणीच्या चौकसपणामुळे तिची फसवणूक टळली. अभिजितकडे चार डजनच्या जवळपास कोरे कार्ड सापडल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
आपण रॉ चे तसेच शास्त्रज्ञ असल्याच्या थापा मारुन अनेकांना अडीच कोटी रुपयांना गंडविणाऱ्या अभिजित पानसरेला आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने नाशिक येथून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस कोठडीदरम्यान त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने 28 जणांना गंडविल्याचे समोर आले होते.
हेही वाचा : नासाचे कागदपत्रे इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन त्याने सुरु केला हा "उद्योग'
या प्रकरणात पोलिसा आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी (ता. 16) पत्रकार परिषद घेत माहिती दिली. अभिजित पानसरेकडे रिसर्च अँड अनॉलिसीसी विंग अर्थात रॉ चा अधिकारी असल्याबाबत, आयपीएस अधिकारी असल्याबाबत ओळखपत्रे सापडली होती. ओळखपत्रे जप्त करुन पोलिस पथकाने तपासादरम्यान त्याला नाशिक आणि मुंबई येथे नेले होते.
या ठिकाणावरून पोलिसांनी महत्वाची कागदपत्रे तसेच साहीत्य जप्त केले. यात प्रधानमंत्री कार्यालय, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार सबंधित तयार केलेली कागदपत्रे, नासा आणि रॉ अधिकारी यांचे खोटे व बनावट ओळखपत्र तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे डाटा कार्ड कलर प्रिंटर, बनावट ओळखपत्र तयार करण्यासाठी संच करून ठेवलेले चिप असलेले कोरे कार्ड, काही खोटी ओळखपत्रे, बनावट धनादेशही जप्त करण्यात आले.
हेही वाचा : ती नगरहून फक्त या गोष्टीसाठी येत होती औरंगाबादेत
रिएक्टरही तयार केला होता
अभिजितने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट आरआरसी रिएक्टर प्रोजेक्ट तयार केल्याचे समोर आले. तसेच घरातच कलर प्रिंटरद्वारे बनावट कागदपत्रे तो तयार करीत होता. त्याच्याकडे तीन ते चारडजनच्या जवळपास कोरे कार्ड सापडले आहेत. विविध क्षेत्राचे व बड्या संस्थांचे ओळखपत्र तयार करण्यासाठी या कार्डचा वापर तो करीत होता.
काय आहे प्रकरण
औरंगाबादेतील शरद गवळी (रा. गारखेडा) यांनी आर्थीक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. यात अभिजित विजय पानसरे (रा. गोविंदनगर, नाशिक) याने एका वकीलाच्या मदतीने नासाच्या आरआरसी रिएक्टर प्रकल्पामध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. यानंतर त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले होते.
हेही वाचा : जिथे काम करीत होता तिथेच ट्रकखाली दबून अभियंत्याचा मृत्यू