रुग्णालयांमध्ये महिनाअखेर एक हजार ८०८ बेड्स होणार उपलब्ध, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत

4Beds_0
4Beds_0

औरंगाबाद : शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. महिनाअखेर शासकीय आणि खासगी अशा सर्व रूग्णालयांत एक हजार ८०८ पर्यंत खाटांची वाढीव उपलब्धता होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले. तसेच कोविड केअर सेंटर खासगी रुग्णालयाअंतर्गत संलग्न केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी सोबत कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय सिरसाट, अतुल सावे, अंबादास दानवे, पोलीस आयुक्ती निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मुलाने कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारताच चाकू हल्ला, औरंगाबादेत धक्कादायक...

ऐंशी टक्के वैद्यकीय तर २० टक्के औद्योगिक क्षेत्रासाठी ऑक्सिजन
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात लिक्वीड ऑक्सिजनची मागणी वाढलेली असून हा ऑक्सिजनसाठा पुण्याहून मागवण्यात येतो. गेल्या दोनचार दिवसात पुरवठा प्रक्रियेतील काही तांत्रिक बाबींमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने ऑक्सीजन मागवण्यात विलंब झाला होता पण ती प्रक्रिया सुरळीत करण्यात आली आहे. सध्याची आरोग्यक्षेत्राची गरज लक्षात घेऊन ८० टक्के वैद्यकीय तर २० टक्के औद्योगिक क्षेत्रासाठी या प्रमाणेच ऑक्सीजन पुरवठा करणे बंधनकारक आहे. प्रशासन प्राधान्याने डॉक्टरांची संख्या, खाटांची उपलब्धता यावर भर देत आहे. तातडीने उपचार होण्यासाठी शासकीय रुग्णांलयांमध्ये ७० खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहे.

ऑक्सिजन पुरवठा नियंत्रित
मनपा आयुक्त पांडेय यांनी खाटांची संख्या वाढवण्यासाठी कोविड केअर सेंटर हे खासगी रूग्णालयांसोबत संलग्न करण्यात येणार आहे. जेणेकरून रूग्णांना गरजेनुसार संबंधित रूग्णालय पूढील उपचार सुविधा उपलब्ध करून देईल. ऑक्सीजन पुरवठा व्यवस्थितपणे नियंत्रीत होत असून लक्षणे नसलेल्यांनी होम क्वारंटाइन होऊन उपचार घेतल्याने ही आवश्यक रूग्णांसाठी खाटा उपचार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.

औरंगबाद जिल्ह्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र बुधवारपासून रात्री नऊनंतर बाजारपेठा...

लोकप्रतिनीधींनी केल्या सूचना
आमदार हरिभाऊ बागडे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत फक्त व्हेंटीलेटरवरच्या रूग्णांनाच सवलत दिल्या जात आहे, मात्र कोरोना संसर्गाच्या संकटाचा विचार करून गरीब रूग्णांना या निकषामध्ये शिथिलता आणुन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा. तसेच लक्षणे असलेल्या पण तपासणी अहवाल न आलेल्यांना तातडीने दाखल करून घ्यावे.


आमदार शिरसाट यांनी वाढत्या रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व आवश्यक रूग्णांना खाटा, उपलब्ध होण्याच्या दृष्टीने क्वारंटाइन सेंटर खाजगी रूगणालयांना उपचार करण्यासाठी दिल्यास मोठ्या संख्येत अतिरीक्त खाटा रूग्णालयांकडे उपलब्ध होतील. आमदार जैस्वाल यांनी बाजारपेठ व इतर सर्व दुकाने बंद करण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवून सर्वांनाच त्या ठराविक वेळेपर्यंत दुकान, व्यवहार बंद करणे बंधनकारक करावे असे सूचीत केले.

आमदार सावे यांनी जिल्ह्यातील आयसीयु बेड आणि व्हेंटीलेटर खाटांची संख्या तातडीने वाढवणे गरजेचे असून त्याप्रमाणात डॉक्टर, नर्सेस, सेवकांची संख्या वाढवणे, त्यासाठी वेतनश्रेणीत वाढ करणे या बाबी तातडीने करून पूरेसे मनुष्यबळ घाटीला उपलब्ध करून देण्याचे सूचीत केले. आमदार दानवे यांनी खाटांची संख्या, ऑक्सीजन साठा वाढवणे गरजेचे असून संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षण मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घ्यावा असा सूचना केल्या.

चालकाने लेकीच्या लग्नासाठी जमा केलेली १ लाखांची पुंजी ओळखीच्याच भामट्याने...

रूग्ण बाधिताचे प्रमाण ८.३८ टक्के
जिल्ह्यात ७६ टक्के रुग्ण बरे होत आहे. तर मृत्युदर २.७९ टक्के आहे. रूग्ण बाधिताचे प्रमाण ८.३८ तर चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. यामध्ये आटीपीसीआर ८.४९३ तर ॲण्टिजेन चाचण्या २३२९४४ या प्रमाणे अशा एकूण चाचण्या ३१३४३७ इतक्या झाल्या आहेत. तसेच डिसीएचसी, डिसीएच, डिसीसीसी अशा एकुण १०८ ठिकाणी १२६६४ आयसोलेशन बेड तर १४९१ ओटु बेड उपलब्ध आहे. तसेच ४८८ आयसीयु बेड तर २३० व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. १०४० रूग्ण होम आयसोलेशन पद्धतीने उपचार घेत आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी यावेळी दिली.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com