Prakash Ambedkar: ओबीसी आरक्षण बचावासाठी काढणार महामोर्चा : प्रकाश आंबेडकर
OBC Reservation: वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी महामोर्चा काढण्याची घोषणा केली. भाजपवर आरोप केला की त्यांनी ओबीसी आरक्षण कमी करून इतरांना फायदा दिला, त्यामुळे ओबीसी समाजाचे हित धोक्यात आहे.
छत्रपती संभाजीनगर : ‘भारतीय जनता पक्ष (भाजप) ओबीसींच्या जोरावर सत्तेवर आला. आपणच ओबीसींचे कैवारी म्हणून भाजपचे नेते बोलताना दिसतात. परंतु, ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणातून इतरांना आरक्षण देण्याचा घाट भाजपने घातला.