Nanded OBC Reservation Issue
esakal
छत्रपती संभाजीनगर
OBC Reservation Nanded : मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही; नांदेड शहरामध्ये ओबीसी हक्क परिषदेत ठराव
Nanded Protest : नांदेडमध्ये झालेल्या ओबीसी हक्क परिषदेत फडणवीस सरकारच्या आरक्षणविरोधी धोरणाचा निषेध करत, महायुतीच्या मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा ठराव करण्यात आला.
नांदेड : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण संपुष्टात आणल्याचा आरोप करत नांदेड येथे सोमवारी (ता. आठ) झालेल्या ओबीसी हक्क परिषदेत ठराव घेऊन त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच महायुतीच्या मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही यासह विविध ठराव यावेळी घेण्यात आले.

