मराठवाड्यात ‘ऑक्टोबर हीट’चा कडाका, तापमानात सरासरीच्या २ ते ४.५ अंशांनी वाढ, २० ऑक्टोबरनंतरच घटीची शक्यता

मराठवाड्यात ‘ऑक्टोबर हीट’चा कडाका, तापमानात सरासरीच्या २ ते ४.५ अंशांनी वाढ, २० ऑक्टोबरनंतरच घटीची शक्यता
Published on: 
((मुख्य अंक)) ................ मराठवाड्यात ‘ऑक्टोबर हीट’चा कडाका तापमानात २ ते ४.५ अंशांनी वाढ, २० ऑक्टोबरनंतरच घटीची शक्यता सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १० : मराठवाड्यासह राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला आहे. नैर्ऋत्य मॉन्सूनने महाराष्ट्रातून त्याच्या सरासरी वेळेच्या दोन दिवस आधीच निरोप घेतला आहे. त्यामुळे निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत उष्णतेची तीव्रता वाढली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात सरासरी तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअसदरम्यान असते. मात्र, यंदा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच दुपारच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सध्याचे कमाल तापमान ३४ ते ३६.६ अंश सेल्सिअस नोंदवले जात असून, हे प्रमाण सरासरीपेक्षा २ ते ४.५ अंशांनी अधिक आहे. सध्या पहाटेच्या किमान तापमानात फारशी वाढ झालेली नसली तरी १६ ते २२ ऑक्टोबर या आठवड्यात रात्रीचा उकाडाही वाढण्याची शक्यता ज्येष्ठ (निवृत्त) हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविली आहे. ........... ((पॉइंटर)) उष्णतावाढीची मुख्य कारणे - मॉन्सून काळात एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जमिनीतील आर्द्रता घटली आहे. - उत्तर गुजरात ते पश्चिम बंगाल दरम्यान तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात हवेचा दाब सरासरीपेक्षा (१०१२ ते १०१४ हेक्टोपास्कल) वाढला आहे. - उत्तर भारतातून ताशी २० ते २५ किमी वेगाने येणारे वारे पश्चिमेकडून अरबी समुद्राकडे वाहत असल्याने समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अटकाव होत आहे. - ढग गायब असल्याने सूर्याची थेट आणि तीव्र किरणे दिवसभर जमिनीवर पडत आहेत. ......... पावसाची शक्यता नाही पुढील दोन आठवड्यांत भारतीय समुद्री क्षेत्रात कोणतेही चक्रीवादळ अथवा मराठवाड्यात पावसाची शक्यता जाणवत नाही. २० ऑक्टोबरपासून (दसऱ्याच्या सुमारास) कमाल तापमानात हळूहळू घसरण होऊन नागरिकांना उष्णतेच्या या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो, असा अंदाज खुळे यांनी वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com