गंगापूर-वैजापूर रस्त्यावर कार व ट्रॅव्हल बसची धडक, एक ठार अन् १ गंभीर जखमी | Aurangabad Accident News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Accident News

गंगापूर-वैजापूर रस्त्यावर कार व ट्रॅव्हल बसची धडक, एक ठार अन् १ गंभीर जखमी

महालगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर मार्गावर महालगाव जवळील शेताजवळ गट नं.१९८ दौलतराव शेळके यांच्या वस्तीजवळ कार व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. यात कारचालक जागीच ठार, तर एक जण जखमी झाला. विलास दिनकर पुंड (रा.वाळूज) असे मृत कारचालकाचे नाव आहे. जखमीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर-वैजापूर रस्त्यावर रात्री १२ वाजेच्या सुमारास सवेरा कंपनीची ट्रॅव्हल बस (एमएच २० ईजी ५५७७) ही वैजापूरच्या दिशेने जात असताना समोरुन येणारी कारची (एमएच ०६ एडब्ल्यू ५५६१) समोरासमोर धडक झाली.(One Died In Accident On Gangapur-Vaijapur Road Of Aurangabad)

हेही वाचा: Aurangabad News | हळद सुकण्यापूर्वीच तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

यात कारचालक विलास दिनकर पुंड (वय ४२, रा.वाळूज) यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी अहेमद अली सय्यद यांना स्वामी विवेकानंद रुग्णवाहिकेतील चालक सागर शेजवळ यांनी पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात गंगापुर येथे भर्ती केले. पुढील तपास विरगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पंडूरे हे करीत आहेत. वैजापूर (Vaijapur) -गंगापूर मार्गावर अपघाताची दुर्दैवी मालिका सातत्याने सुरु आहे. (Aurangabad)

हेही वाचा: वैजापूर पोलिस हे महिलांचे रक्षक की भक्षक? चित्रा वाघ

दररोज छोटे-मोठे अपघात (Accident) घडत असतात. यात अनेकांचे जीव गेले आहे. पाच दिवसात झालेल्या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवला आहे

Web Title: One Died In Accident On Gangapur Vaijapur Road Of Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top