

Chhatrapati Sambhajinagar
esakal
जाधववाडी: यंदाच्या हंगामात सुरवातीपासूनच कांद्याच्या भावात कमालीची घसरण दिसून आली. जाधववाडी भाजीमंडईत मार्चपर्यंत कांद्याला मिळालेल्या भावातून किमान खर्च तरी वसूल होत होता. मात्र, एप्रिल महिना सुरू झाला आणि ठोक बाजारात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. यामुळे आता कांदा पिकावर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. जाधववाडीत कांद्याला मंगळवारी (ता.२१) सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कमाल भाव २५० व किमान भाव ६५० नोंदवला गेला.