Aurangabad : ज्येष्ठ नागरिकांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन दरोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurngabad

ज्येष्ठ नागरिकांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन दरोडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पेटीएम खाते केवायसी करण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या बॅंक खात्यातून तब्बल ९८ हजार रुपये काढून, ऑनलाइन दरोडा टाकण्यात आला आहे. या प्रकरणी एचडीएफसी बॅंकेसह चार बॅंकेच्या व्यवस्थापकांसह संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको एन-१ येथील रहिवासी उदय व्यंकटराव पाटील (वय ६४) यांना २५ जून रोजी पेटीएमचे केवायसी करण्यासाठी मेसेज आला होता. केवायसी करण्यासाठी भामट्याने त्यांना दिलेल्या खात्यावर एक रुपया पाठवण्यास सांगितला. अवघ्या एक रुपयांचा विषय असल्याने पाटील यांनी एक रुपया पाठवला. त्यानंतर भामट्याने मोबाइल हॅक करून त्यांच्या एचडीएफसी बॅंकेच्या आकाशवाणी येथील शाखेच्या खात्यातून एक वेळा ४९ हजार ८९० रुपये काढून घेतले. तर लगेचच दुसऱ्या वेळेला पुन्हा ४९ हजार रुपये असे एकूण ९८ हजार ८९० रुपये काढून घेतले. आपल्या खात्यावर ऑनलाइन दरोडा टाकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर न्यायालयातही दाद मागितली.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी शनिवारी (ता. तेरा) या प्रकरणात आरोपी एचडीएफसी बॅंकेच्या आकाशवाणी शाखेचे व्यवस्थापक, कॉर्पोरेशन बॅंकेचे व्यवस्थापक, अलाहाबाद बॅंकेचे व्यवस्थापक व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात चोरी करणे, ऑनलाइन दरोडा टाकणे, फसवणूक करणे, संगनमत करणे, कट रचणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक श्री. जाधव हे करत आहेत.

loading image
go to top