esakal | औरंगाबाद जिल्ह्यात ५८ वर्षांत केवळ २९९ खासगी रुग्णालयांचीच नोंदणी!
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal News

बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार खासगी रुग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत, गत ५८ वर्षात फक्त २९९ रुग्णालयांनीच नोंदणी केली.

औरंगाबाद जिल्ह्यात ५८ वर्षांत केवळ २९९ खासगी रुग्णालयांचीच नोंदणी!

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद  : बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार खासगी रुग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत, गत ५८ वर्षात फक्त २९९ रुग्णालयांनीच नोंदणी केली. नोंदणी न करताच गावा-गावात अनेक रुग्णालये सुरू आहेत. नोंदणी न करताच ग्रामीण भागात रुग्णालये थाटून आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करावी. या तपासणीचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करावा. असे आदेश आरोग्य सभापती अविनाश गलांडे पाटील यांनी विषय समितीच्या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली विषय समितीची बैठक झाली. यात ग्रामीण भागात सुरू असलेल्या खासगी रुग्णालयांचा मुद्द्यावर चर्चा झाली.

विजेचा शॉक लागून शेतकरी महिलेचा मृत्यू; गेवराई खुर्द येथील घटना

कायद्यानूसार खासगी रुग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. पण जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत ५८ वर्षात फक्त २९९ रुग्णालयांनीच नोंदणी केली. नोंदणी न करता आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली यावर खासगी रुग्णालयांची तपासणी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी डॉ. सूधाकर शेळके यांना दिले.
यावेळी बैठकीत कोविड-१९ लसीकरण मोहिम, ‘एनआरएचएम’, विभागीय औषधी भांडार बांधणीचे सुरू असलेले काम, प्राथमिक आरोग्य केंद्रातील भंगार साहित्यांचा लिलाव आदी मुद्यावरही चर्चा झाली. सदस्य स्वाती निरफळ, शिवाजी ठाकरे, बबन कुंडारे, शिला मिसाळ, वैशाली पाटील यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, डॉ. उल्हास गंडाळ, डॉ. विजयकुमार वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दाते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


नोंदणीकृत रुग्णालयांची संख्या
औरंगाबाद - ७९
पैठण - ६०
गंगापूर - ६९
फुलंब्री - १८
वैजापूर - ६
सोयगाव - ६
कन्नड - २८
सिल्लोड - २०
खुलताबाद - १३

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top