विजेचा शॉक लागून शेतकरी महिलेचा मृत्यू; गेवराई खुर्द येथील घटना

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 5 January 2021

जनावरे बांधण्यासाठी शेतात केलेल्या पञ्याच्या गोठ्यात विद्युत प्रवाह उतरल्याने गोठ्याचे दार उघडण्यासाठी गेलेल्या शेतकरी महिलेचा विजेचा शॉक लागुन मृत्यू झाला आहे

आडुळ (जि.औरंगाबाद) : जनावरे बांधण्यासाठी शेतात केलेल्या पञ्याच्या गोठ्यात विद्युत प्रवाह उतरल्याने गोठ्याचे दार उघडण्यासाठी गेलेल्या शेतकरी महिलेचा विजेचा शॉक लागुन मृत्यू झाला आहे. ही घटना गेवराई खुर्द ता. पैठण येथे सोमवारी (ता.४) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.

शेतकरी महिलेचे नाव पदमाबाई सुरेश सांगळे वय ४२ वर्षे,असे आहे. गेवराई खुर्द (ता.पैठण) येथील शेतकरी सुरेश भावराव सांगळे यांची गेवराई खुर्द शिवारातील गट क्रमांक 120 मध्ये शेती असून या शेतात त्यांनी त्यांचे जनावरे बांधण्यासाठी लोखंडी पञ्याचा गोठा केलेला आहे.

कोविड-19 लसीकरण केंद्रावरील पथके प्रशिक्षणासह सज्ज ठेवा - जिल्हाधिकारी चव्हाण

सोमवारी दुपार नंतर परिसरात संततधार पाऊस सुरु असल्याने ते आज रात्री पत्नी पदमाबाई सुरेश सांगळे हिच्यासोबत शेतात झोपण्यासाठी गेले. पती सुरेश सांगळे यांनी पत्नी पदमाबाई हिस दुचाकी वरुन उठविल्यानंतर गोठ्याचे दार उघडण्यास सांगितले तो पर्यंत सुरेश हे दुचाकी बाजुला लावित होते. त्यामुळे पद्माबाई यांनी दाराला हात लावताच त्यांना जोराचा शॉक लागला. यानंतर सुरेश सांगळे यांनी गावात याची कल्पना दिली यानंतर त्यांना आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. माञ तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

तरुणाच्या अंत्यविधीस नातेवाईकांचा नकार; ट्रॅक्टरच्या धडकेत झाला होता मृत्यू

वैद्यकीय अधिकारी अनुपस्थिती -
सदरील शेतकरी महिलेला आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले मात्र येथे कार्यरत तिन वैद्यकीय अधिकारयापैकी एक ही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident happened aurangabad Farmer woman dies in electric shock