छत्रपती संभाजीनगर : शहरातील अवैध दारू विक्री, वाहतूक आणि बुडणारा महसूल वाचवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम सुरू केली. त्यातून २० आणि २१ जूनला दोन दिवसांत १२० जणांना अटक करण्यात आली. .त्याचबरोबर ३२ गुन्हे नोंदवून दोन लाख २ हजार ८५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची पोलखोल ‘सकाळ’ने केली. याची दखल घेऊन पोलिस प्रशासनासह सर्वच विभाग अर्लट मोडवर येऊन काम करत आहेत..याच दरम्यान ‘सकाळ’ने शहरातील नशेखोरीसह उघड्यावरील दारू पिणारे, बूट लेगिंगसह दमन, गोवा येथून चोरटी वाहतूक करणाऱ्या यंत्रणेची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिनव बालुरे यांनी या अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम सुरू केली..Nanded News : पावसाने पाठ फिरवताच शेतकरी चिंतेत! कोवळी पिकं वाचवण्यासाठी तुषार सिंचनाची धावपळ.या अंतर्गत जिल्हाभरात छापेमारी करून अवैध दारू विक्रीवर कारवाई केली जात आहे. यात १२० आरोपींना अटक करून १०२.४६ बल्क लिटर देशी दारू, १२.८ बल्क लिटर विदेशी दारू तर ९ बल्क लिटर बीअर जप्त केली. त्याचबरोबर इतर मुद्देमालात ३३ हजार ५२५ रुपये मिळून एकूण दोन लाखांचा माल जप्त केला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली..शहरासह परिसर, तसेच वाळूज आणि परिसरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आमच्या विभागाने कारवाई केली आहे. त्याचबरोबर ‘ऑपरेशन प्रहार’ जिल्हाभर राबवण्यात येत आहे. यातून अनेक ठिकाणी छापे टाकले. पुढील आदेशापर्यंत ‘ऑपरेशन प्रहार’ सुरूच राहणार आहे.- अभिनव बालुरे, अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.