esakal | ‘एनपीआर’साठी कोणतीच माहिती देणार नाही असं कोण म्हणाले

बोलून बातमी शोधा

‘एनपीआर’साठी कोणतीच माहिती देणार नाही असं कोण म्हणाले

मौलाना अब्दुल हमीद म्हणाले, की एनपीआरला विरोध करण्यासाठी वसाहतींमधील प्रत्येक घराच्या दरवाजांवर गो बॅक- नो एनपीआर असा मजकूर असलेले स्टिकर लावण्यात येणार आहे. यासाठी मोहल्ला कमिटी तयार करण्यात येणार असून, यामध्ये मुस्लिम, दलित, शीख व इतर धर्मांतील युवकांचा समावेश राहणार आहे.

‘एनपीआर’साठी कोणतीच माहिती देणार नाही असं कोण म्हणाले
sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबादः एनपीआरच्या विरोधात आता बहिष्काराचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीआर ही एनआरसीची पहिली पायरी आहे. एनपीआरसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारची माहिती दिली जाणार नाही. उलट त्यांना एक फूल देऊ परत पाठविले जाईल अशी माहिती मंगळवारी (ता.३) कुलजमाती विफाफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद अझहरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मौलाना अब्दुल हमीद म्हणाले, की एनपीआरला विरोध करण्यासाठी वसाहतींमधील प्रत्येक घराच्या दरवाजांवर गो बॅक- नो एनपीआर असा मजकूर असलेले स्टिकर लावण्यात येणार आहे. यासाठी मोहल्ला कमिटी तयार करण्यात येणार असून, यामध्ये मुस्लिम, दलित, शीख व इतर धर्मांतील युवकांचा समावेश राहणार आहे.

हेही वाचा - कारखान्यातील 85 टक्के अपघात चुकीच्या क्रीयांमुळेच 

नागपूरमधील एक संघटना देशातील एससी, एसटी, अल्पसंख्याक समाजाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी हा प्रकार सुरू असून, या संघटनेद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून असा प्रकार सुरू असल्याचे अझहरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव न घेता सांगितले. काळ्या कायद्यामुळे देशातील ४० टक्के लोक प्रभावित होत आहेत, दिल्लीच्या घटना ही हिंदू-मुस्लिमचा वाद नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. यावेळी झियाउद्दीन सिद्दिकी, सय्यद वहाब, कामरान खान, मेराज सिद्दिकी, मुक्ती खलीलउल रहेमान, मौलाना तुफैल नदवी, सय्यद वहाब, अहेमद जलीस, मुजीब पटेल, हाफीज सलमान यांची उपस्थिती होती.