Chhatrapati Sambhajinagar : अनाथ पूजाला मिळाली सात जन्मांची साथ; जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले कन्यादान
Heartwarming Story : अनाथ पूजाला केवळ हक्काचे घरच नव्हे, तर जीवनभराचा साथीदार मिळाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कन्यादान करत तिला नव्या आयुष्याची भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर : ती अनाथ. बालगृह-राज्यगृह हेच तिचे घर; पण आज तिला केवळ हक्काचं घरच मिळाले नाही तर साताजन्मासाठी जिवाभावाचा जीवनसाथीही मिळाला. या मंगलकार्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि करुणा स्वामी यांनी आई-वडिलांप्रमाणे कन्यादान केले.