esakal | उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील दुसऱ्यांदा कोरोना पाॅझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील दुसऱ्यांदा कोरोना पाॅझिटिव्ह
उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील दुसऱ्यांदा कोरोना पाॅझिटिव्ह
sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांना कोरोनाने दुसर्‍यांदा गाठले आहे. आज सोमवारी (ता.२६) त्यांची टेस्ट केल्यानंतर अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. गेल्या वर्षी त्यांना सप्टेंबरमध्ये कोरोनाची लागण झाली होती. यावेळीही त्यांना पुन्हा लागण झाल्याचे दिसून येत आहे. आमदार घाडगे पाटील यांच्या परिवारातील सगळ्याच सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात वडील बाळासाहेब पाटील व आई दोघांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. पत्नी व मुलगी, भावजय व पुतणी या सुध्दा बाधित असुन ते सर्व डाॅक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाईन झाले आहेत.

हेही वाचा: सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

काही दिवसांपूर्वी आमदाराचे बंधु अतिष पाटिल दवाखान्यातून घरी परतले होते. आता एकाच वेळी घरातील सगळेच सदस्य पाॅझिटिव्ह आल्याने आमदार पाटील यांनीही चाचणी करुन घेतली तेव्हा तेही बाधित असल्याचे अहवालावरुन लक्षात आले. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी थेट कोरोना वार्डात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. आज दिवसभर पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या दौर्‍यातही ते सहभागी होते. प्रत्येक कार्यक्रमात ते सोबतच होते. काही दिवसांपूर्वीच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या परिवारातले सगळेच सदस्य पाॅझिटिव्ह आले होते. आता ते यातुन बरे झाल्यानंतर आमदार घाडगे पाटीलही बाधित झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या तावडीतून लोकप्रतिनिधि देखील वाचले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.