esakal | जन्मदात्यांनीच नाकारले एवढ्याशा जीवाला, उमरग्यात 'नकोसी'ला मिळाले जीवदान

बोलून बातमी शोधा

null
जन्मदात्यांनीच नाकारले एवढ्याशा जीवाला, उमरग्यात 'नकोसी'ला जीवदान
sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला बुधवारी (ता.२१) पहाटेच्या सुमारास जन्मदात्यांनी झाडीमध्ये टाकुन पोबारा केला. 'त्या' अर्भकाचा रडण्याच्या आवाजाने बघ्याची गर्दी जमली. मात्र स्त्रीत्वाची जाणीव असलेल्या अपूर्वा महाडिक या महिलेनी त्या अर्भकाला घेऊन उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उमरगा शहरातील बालाजीनगर भागात एका ठिकाणी साधारणतः तीन ते चार तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक टाकुन क्रुर मनाच्या दांपत्य निघून गेले आणि बुधवारी पहाटे चारपासुन मला पूनर्जन्म मिळण्याची आर्त हाक 'ती' चिमूकली रडण्यातुन सांगत होती.

काही जणांच्या ही बाब लक्षात आली. मात्र त्यांनी नसती झंझट म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. याच परिसरात वास्तव्यास असलेले अजिंक्यराजे महाडिक व अपूर्वा महाडिक दापंत्यांनी या बाबतची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांना दिली. तातडीने महाडिक दांपत्यांनी त्या अर्भकाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या सोबत उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड होते. डॉक्टरांनी त्या अर्भकाची वैद्यकीय तपासणी केली. शिवाय कोरोनाची रॅपिड चाचणी केली सुदैवाने ती निगेटिव्ह आली.

मात्र माणूसकीची नाळ घट्ट ! : नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक नेमके कोणाचे, याचा शोध पोलिस घेतील. मुलगी नको म्हणून तिला फेकून देण्याची नकारात्मक मानसिकता असू शकते अथवा अन्य कारणही असेल. अजुन तिची नाळ तुटलेली नव्हती. पण समाजामध्ये आणखी माणुसकीची नाळ घट्ट असल्याची प्रचिती महाडिक दापंत्यांच्या धाडसात दिसून आली. दरम्यान त्या चिमूकल्या बाळाला पुढील उपचारासाठी उस्मानाबादला नेण्यात येणार असल्याचे पोलिस नाईक लक्ष्मण शिंदे यांनी सांगितले.