esakal | नाकाबंदी दरम्यान आढळला आठ लाख किंमतीचा गांजा
sakal

बोलून बातमी शोधा

नाकाबंदी दरम्यान आढळला आठ लाख किंमतीचा गांजा

नाकाबंदी दरम्यान आढळला आठ लाख किंमतीचा गांजा

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील (Maharashtra-Karnataka Border) तलमोड येथे नाकाबंदी दरम्यान सोमवारी (ता.तीन) रात्री बारा वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पथकाने केलेल्या तपासणीत एका वाहनात सात लाख ८७ हजार किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा व वाहन असा एकुण अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्याच्या सीमा सील करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याने उमरगा (Umarga) तालुक्यात तलमोड, कसगी व कवठा या तीन ठिकाणी सीमा तपासणी पथक चोवीस तास कार्यरत करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन , उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले यांनी लॉकडाऊनच्या (Lock Down) निमित्ताने सोमवारी सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन पोलिसांना मार्गदर्शन करुन सूचना दिल्या होत्या. (Osmanabad Crime News Eight Lack Marijuna Found Umarga)

हेही वाचा: बंगालच्या निकालाने भाजपचा ग्राफ लागला उतरणीला : इम्तियाज जलील

दरम्यान याच दिवशी रात्री बाराच्या सुमारास पथकातील पोलिस कर्मचारी श्री. उंबरे, श्री. घुले, होमगार्ड श्री. राठोड, श्री. चौधरी, जलसंपदा विभागाचे अनिल पोवाडकर, विक्रम बाळेकर यांनी बंद बॉडीच्या टेम्पोची तपासणी केली असता (एमएच १४ एचजी ६५१५) त्यात चार प्लास्टिकच्या गोण्यात एकुण ७८ किलो ७३५ ग्रॅम वजनाचा गांजा अंमलीपदार्थ आढळून आला. त्याची किंमत सात लाख ८७ हजार ३५० रुपये आहे. वाहनासह एकूण जप्त दहा लाख ९२ हजार ३५० रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वाहन चालक प्रकाश नरेंद्र बेहेरा (वय २२, रा.शिरोळी, ता.खेड, जि.पुणे) यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान दोन आरोपींनी अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत. पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, पोलिस अमलदार श्री. उंबरे, श्री. घुले, अतुल जाधव, श्री. साकळे, श्री. कांबळे, श्री. दिवे, होमगार्ड श्री. राठोड, श्री. चौधरी जलसंपदा विभागाचे अनिल पोवाडकर, विक्रम बाळेकर यांनी ही कारवाई केली.

loading image