esakal | दुचाकीच्या व्यवहारातून गोळीबार, आरोपी पसार

बोलून बातमी शोधा

व्याजाच्या पैशांसाठी गोळीबार; बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर दोघांना अटक

दुचाकीच्या व्यवहारातून गोळीबार, आरोपी पसार

sakal_logo
By
शीतलकुमार शिंदे

बेंबळी (जि.उस्मानाबाद) : दुचाकीच्या व्यवहारातून टाकळी (बेंबळी) (ता. उस्मानाबाद) येथे शनिवारी (ता.एक) गोळीबाराची घटना घडली. जमिनीवर गोळीबार केल्याने छर्रे लागून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेतील आरोपी दुचाकीवरून पसार झाला असून अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळी (बेंबळी) येथील सध्या पुण्यात राहत असलेला दीपक धनाजी जगताप यांच्यासोबत अन्य तिघे टाकळी येथे आले होते. मागील पाच वर्षांपूर्वी येथील अनिल सूर्यवंशीकडून त्याने एक दुचाकी विकत घेतली होती. त्या व्यवहारातील रकमेच्या वसुलीसाठी सूर्यवंशी तगादा लावत होता. यातून हा गोळीबार झाला. दुपारी पाच वाजता समाज मंदिरासमोर ही घटना घडली. यात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उजनी (ता. औसा, जि.लातूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्याची माहिती आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत १ हजारांवर कोरोनाबाधित, १ लाख ११ हजार १४५ कोरोनामुक्त

समाज मंदिर येथे सूर्यवंशी व अन्य दोन व्यक्ती गप्पा मारत बसले असता दीपक धनाजी जगताप यांनी तेथे येऊन त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरने जमिनीवर गोळबार केल्याने त्याचे छर्रे उडून ते सूर्यवंशी यांच्यासोबतच्या दोन व्यक्तींना लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. दरम्यान घटनेतील आरोपी दुचाकीवरून पसार झाले आहेत. ते पुण्याकडे गेले असावेत असा पोलिसांचा कयास आहे. या घटनेची नोंद पोलिसांत झाली असून तपास सुरु आहे.