उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकहाती सत्ता; आघाडीचा महाविजय,भाजपचा पराभव

महाविकास आघाडीमध्ये काही नेत्यांनी भाजपला अंतर्गत मदत करूनही भाजपला विजयासमीप पोचता आलेले नाही.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकहाती सत्ता; आघाडीचा महाविजय,भाजपचा पराभव
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकहाती सत्ता; आघाडीचा महाविजय,भाजपचा पराभवsakal media

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक झाली. सोमवारी (ता. २१) झालेल्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे १० उमेदवार विजयी झाले. भाजपच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. बँकेचे एकूण १५ संचालक असून, यापूर्वी महाविकास आघाडीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता बँकेत सर्वच संचालक महाविकास आघाडीचे राहणार आहेत.

ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी झाली. यामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये काही नेत्यांनी भाजपला अंतर्गत मदत करूनही भाजपला विजयासमीप पोचता आलेले नाही. यामुळे आघाडीचे फुटलेले नेतेदेखील तोंडघशी पडल्याचे दिसून आले. पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने सुरुवातीला ही निवडणूक एकतर्फी होणार असे वाटत होते. पण, प्रचारात भाजपने ताकद लावण्याने चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत८०८ मतदारांपैकी ७९८ जणांनी हक्क बजावला.

उपाध्यक्षांचा पराभव

आमदार राणाजगजितसिंह पाटील गटाच्या गेल्यावेळी आठ जागा निवडून आल्या होत्या. नंतर ते पक्ष बदलून भाजपमध्ये गेले. ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. पण, त्यांना यावेळी एकही जागा जिंकता आली नाही. शिवाय बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष कैलास शिंदे व संचालक सतीश दंडनाईक दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. राणा पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर स्थानिक पातळीवरील पहिलीच निवडणूक होती. त्यामध्ये त्यांचा झालेला पराभव इतरही निवडणुकीवर परिणामकारक ठरू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे.

सत्तेतील तिन्ही पक्षांना एकत्रित येऊन भाजपविरुद्ध लढावे लागले. यातच सर्व काही आले. काही अपप्रवृत्तीच्या हातात कारभार जाऊ नये, बँकेची सुधारत असलेली परिस्थिती पुन्हा तेरणा कारखान्यासारखी होऊ नये यासाठी निवडणूक लढविली. पराभवाची कारणमीमांसा व आत्मचिंतन करू. जनतेचा कौल मान्य आहे.

- राणाजगजितसिंह पाटील, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com