उस्मानाबाद जिल्ह्याला ५० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, भूमीपुत्रांचा पुढाकार

जिल्ह्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कृषीवर अवलंबून असल्याने बहुतांश नागरिक सर्वसाधारण कुटुंबातील आहेत.
Oxygen
OxygenSakal

उस्मानाबाद : जिल्ह्याचे सुपुत्र आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले डॉ. रत्नदीप जाधव आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे (Maratha Chamber Of Commerce) प्रशांत गिरबने यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या मिशन वायू अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ५० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर (Oxygen Concentrator) विनामूल्य उपलब्ध करून दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. पाच) त्यांनी येऊन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सुपूर्द केले. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कृषीवर अवलंबून असल्याने बहुतांश नागरिक सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. याची जाणीव असल्याने डॉ. जाधव यांनी अशा कठीण परिस्थितीत जिल्ह्याच्या (Osmanabad) मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. डॉ. जाधव आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे गिरबने यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या मिशन वायू अंतर्गत जिल्ह्यासाठी ५० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत तर अजून २० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. (Osmanabad Latest News 50 Oxygen Concentrators Handed Over To District)

Oxygen
औरंगाबादेत आज फक्त १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरण

सध्या जिल्ह्यासाठी ५०० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून घेणे गरजेचे आहेत. शासकीय, सीएसआर या दोन्ही माध्यमातून २५० कॉन्संट्रेटर आता उपलब्ध झाले. उर्वरित कॉन्संट्रेटर घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ. जाधव यांच्यासारख्या तरुणांनी जिल्ह्यासाठी गरजेच्या वेळी मदत झाल्याने दिलासा वाटतो. अशाही परिस्थिती आपण निश्चत वाट काढू.

- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com