मुस्लिम बांधवांची 'रमझान ईद'ची तयारी सुरु, उमरग्यात खरेदीसाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Celebrate Eid-e-Milad at home

मुस्लिम बांधवांची 'रमझान ईद'ची तयारी सुरु, उमरग्यात खरेदीसाठी गर्दी

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्गामुळे (Corona) सलग दुसऱ्या वर्षीही रोजाचा महिना लॉकडाऊनमध्ये (Lock Down) गेला. बहुतांश मुस्लिम बांधवांनी कोरोनाचे नियम पाळत घरातच नमाज पठण केले. महिनाभर रोजा धरत अल्लाहकडे कोरोना निर्मूलनासाठी प्रार्थना केली. दरम्यान शुक्रवारी (ता. १४) रमझान ईद (Eid) असल्याने प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील साहित्य खरेदीसाठी बुधवारी (ता.१२) परवानगी दिल्याने सकाळी सात ते अकरापर्यंत (Umarga) बाजारपेठेत गर्दी झाली होती. कोरोना संसर्गाची पहिली लाट गतवर्षी एप्रिलमध्ये या भागात सुरू झाली. कालांतराने रमझानचा पवित्र महिना सुरू झाला. (Osmanabad Latest News Muslim Community Prepares For Ramazan Eid Festival)

हेही वाचा: मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे आंदोलन; काळे झेंडे लावून 'महाविकास',भाजपचा निषेध

लॉकडाउनच्या स्थितीमुळे घराबाहेर पडणे शक्य नसल्याने असंख्य बांधवांनी घरातच नमाज पठण केले होते. या वर्षी पुन्हा कोरोनाचा दुसरी लाट सुरू झाल्याने रमझानचा पूर्ण महिना मुस्लिम बांधवांनी घरातच उपवास केला. दरम्यान रमझान ईद शुक्रवारी आहे. मात्र लॉकडाउनमुळे नवीन कपडे घेण्यासाठी अडचणी आल्या. काही जणांनी किमान बच्चे कंपनीसाठी कपडे खरेदी केले. शुरखुर्मासाठी लागणारे ड्राय फ्रुट्सची जेमतेम खरेदी करण्यात आली.

सहा वर्षीय मुलाने केला रोजा (उपवास)

रमजान महिन्यात तरुण आणि जेष्ठ नागरिक उपवास करतात. लहान मुलांनाही उपवास करण्याची इच्छा असते. उमरगा शहरातील जकापूर कॉलनीच्या राम नगर येथील सहा वर्षीय आयान हैदर तांबोळी या बालकाने मंगळवारी (ता.११) त्याचा पहिला रोजा पूर्ण केला. दिवसभर कसलेही अन्न, पाणी न घेता अतिशय कठीण रोजा त्याने पूर्ण केला. सायंकाळी नमाज पठण त्याने उपवास सोडला. त्यामुळे आयानचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Osmanabad Latest News Muslim Community Prepares For Ramazan Eid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top