
कन्नड : गतवर्षी सुरू झालेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार ४ लाभार्थींनी आपल्या घराच्या छतावर सौरऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. यामुळे त्यांची घरे उजळली आहे. केंद्र शासनाने १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा केली होती. यात घरांवर सौर पॅनेल बसवून त्याद्वारे निर्माण झालेली वीज स्वतःसाठी वापरायची व शिल्लक असलेली वीज महावितरणला विकण्याचे धोरण आहे. या योजनेंतर्गत शासनाने देशातील एक कोटी कुटुंबांना प्रकाश देण्यासाठी दरमहा ३०० युनिट मोफत वीज पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार या योजनेसाठी जिल्ह्यातील २ हजार ४०० लाभार्थींची गतवर्षी निवड झाली. यात सर्वाधिक ९९५ लाभार्थी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील (शहर वगळता) असून, सर्वांत कमी ८ लाभार्थी सोयगाव तालुक्यातील आहेत.