छत्रपती संभाजीनगर : शिक्षकांच्या बदल्यांसाठी संवर्ग १ व २ ला नकार आणि होकार देण्यासाठी बदली पोर्टल सोमवारी (ता. नऊ) रात्री १२ वाजता बंद झाले. त्यानंतर जिल्ह्यातील ३ हजार ६७८ शिक्षक बदलीपात्र ठरले असून तब्बल १,४७६ शिक्षक संवर्ग १ चा लाभ घेणार आहेत. .प्रशासनाच्या सूचनेनुसार मंगळवारी (ता. १०) जिल्हाभरातील सर्व पंचायत समित्यांमध्ये संवर्ग एक व दोनसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांच्या तपासणीची लगीनघाई युद्धपातळीवर चालू होती. संवर्ग १ आणि २ मधील शिक्षकांच्या कागदपत्र पडताळणीसाठी त्या-त्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या त्रिस्तरीय समितीने वेगवेगळ्या स्तरांवर पडताळणी केली..संवर्ग १ आणि २ मधील शिक्षकांनी ऑनलाइन भरलेले होकार/नकारचे अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरून पडताळणी करण्याची सुविधा १० ते १२ जून असे तीन दिवस चालू राहणार आहे. यादी प्रकाशित केल्यानंतर त्यावर इतर शिक्षकांना आक्षेप घेण्याची संधी दिली जाईल. आक्षेप आल्यास त्यावर सीईओ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सुनावणी घेऊन निर्णय देत सदर अर्ज स्वीकृत केले किंवा नाकारले जातील. यानंतर संवर्ग १ आणि २ मधील पात्र अंतिम याद्या जिल्हा स्तरावरून प्रसिद्ध करून अंतिम केल्या जातील. त्यानंतर बदलीसाठी शाळा भरण्याची संधी मिळेल. साधारणतः १२ जूनपासून त्यांचे बदली प्राधान्य पसंतीक्रम फॉर्म भरण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे..आकडेवारी अशीएकूण बदलीपात्र शिक्षक संख्या - ३,६७८विशेष संवर्ग भाग - एक प्राप्त अर्ज - १,४७६विशेष संवर्ग भाग - दोन प्राप्त अर्ज - ३५५बदली अधिकार प्राप्त (संवर्ग-३) - ३२३बदली पात्र संवर्ग चारचे शिक्षक - १,५२४.Chh. Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आदेश, २९ प्रभागात होणार १२६ नगरसेवकांची निवड.पुढील टप्प्यात प्रशासनाने ऑनलाइन अर्जाद्वारे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया लगेच सुरू करावी. जेणेकरून बदली प्रक्रियेतील विलंबामुळे आलेले अनिश्चिततेचे सावट दूर करून शिक्षकांची उपलब्धता आणि स्थिरता सुनिश्चित होईल. सर्व शिक्षकांना समान न्याय आणि संधी मिळणे आवश्यक आहे. बदली प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही याचा फायदा होईल.- राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.