
छत्रपती संभाजीनगर : राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे राबवण्यात येत असलेली अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मागील चार दिवसांत ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, यामध्ये ४४ हजार ४९० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह शुल्क भरून आपली नोंदणी पूर्ण केली.