
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पॉलिटेक्निकच्या पहिल्या प्रवेश फेरीत प्रवेश निश्चितीसाठी अखेरच्या दिवशी मंगळवारी (ता. १५) पालक, विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू होती. मराठवाड्यातील ६४ महाविद्यालयांत ७ हजार १७९ प्रवेश निश्चित झाले. अलॉटमेंट मिळालेल्या तब्बल ५२ टक्के विद्यार्थ्यांनी जागास्वीकृती करून प्रवेश निश्चित केले, असे तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. किरण लाढाणे यांनी सांगितले.