
elderly women diseases
Sakal
वृद्धापकाळात महिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढत असून, ७९ टक्के महिलांना आजार जडले आहेत. कुटुंबातील दुर्लक्षामुळे ४० टक्के वृद्धा दुखणे अंगावर काढतात. सुजाता पाटील यांच्या संशोधनातून हे निष्कर्ष समोर आले आहेत, ज्यात महिलांच्या आरोग्याच्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
योगेश पायघन
वृद्धापकाळात महिलांच्या आरोग्याच्या समस्या झपाट्याने वाढत असून शहरातील तब्बल ७९ टक्के वृद्ध महिलांना आजार जडलेले आहेत, असा निष्कर्ष सुजाता पाटील यांच्या संशोधनातून समोर आला. कुटुंबातील दुर्लक्षामुळे ४० टक्के वृद्धा दुखणे अंगावर काढतात, हेही वास्तव उघड झाले.