Electricity Theft: पावणेअकरा कोटींची वीजचोरी; महावितरण, १० कोटी २९ लाख रुपये दंडाची रक्कम वसूल
Meter Tampering: महावितरणने मराठवाड्यात सहा महिन्यांत वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबविली असून तब्बल ११३ लाख युनिट विजेची चोरी उघडकीस आली आहे. या प्रकरणांत १९१ वीजचोरांवर गुन्हे दाखल करत १० कोटींपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : महावितरणतर्फे मराठवाड्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या मंडल कार्यालय अंतर्गत एप्रिल ते ३० सप्टेंबर या सहा महिन्यांत वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली.