esakal | औरंगाबादमध्ये पुढल्या दोन आठवड्यात ऑक्सिजन प्लांट सुरू होणार
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen plant

औरंगाबादमध्ये पुढल्या दोन आठवड्यात ऑक्सिजन प्लांट सुरू होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरसाठी (Aurangabad covid 19 condition) उभारल्या जाणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे काम दोन आठवड्यात पूर्ण होणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने एक व जिल्हा प्रशासनाने एक असे दोन ऑक्सिजन प्लांट मंजूर झाले आहेत. यातील एक प्लांटचे साहित्य आले असल्याचे आहे, सूत्रांनी सांगितले. कोरोना संसर्गामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत होती. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने ऑक्सिजन बेडचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा वर्षभरापूर्वी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती.

पण वर्षभरानंतरही ऑक्सिजन प्लांट सुरू झाला नाही. लिक्विड ऑक्सिजन प्लांट बारगळल्यानंतर हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे दोन प्लांट मेल्ट्रॉनसाठी मंजूर झाले. एक प्लांट पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मिळाला तर दुसरा प्लांट जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आला आहे. दरम्यान ऑक्सिजन प्लांटचे साहित्य मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर परिसरात आले आहे. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात हा प्लांट कार्यान्वित होईल, असे सांगण्यात आले. पण हा प्लांट जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू केले जात आहे की, पर्यटनमंत्र्यांच्या पुढाकारातून मिळालेला आहे, याविषयी प्रशासन संभ्रमात आहे.

हेही वाचा: लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले

दोन लाख रुपयांचा मिळाला धनादेश
ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी एरॉक्स कंपनीतर्फे दोन लाख रुपयांच्या अनामत रकमेचा धनादेश महापालिकेला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सुरू होणार प्लांट जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात शहर अभियंता सखराम पानझडे यांनी श्री. ठाकरे यांच्या पुढाकारातून मिळालेल्या प्लांटचे साहित्य आल्याचे सांगितले होते.

loading image