Paithan News: सिलिंडरच्या टंचाईवर बायोगॅसची मात; पाचलगावच्या महिलेचा उपक्रम; कृषी विभागाच्या मदतीने उभारले संयंत्र

Pachalgav Woman Leads Rural Energy Initiative: पैठण तालुक्यातील पाचलगाव येथील सुरेखा भगवान बोंबले यांनी घरगुती बायोगॅस संयंत्र उभारून गॅस सिलिंडरच्या टंचाईवर मात केली आहे.
Paithan News

Paithan News

esakal

Updated on

जायकवाडी: घरगुती गॅस सिलिंडरचे वाढते दर आणि ग्रामीण भागात होणारा अनियमित पुरवठा यामुळे सामान्य नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. अशा परिस्थितीत पैठण तालुक्यातील पाचलगाव येथील शेतकरी महिला सुरेखा भगवान बोंबले यांनी स्वतःच्या घरी बायोगॅस संयंत्र उभारून गॅसटंचाईवर यशस्वी मात केली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे त्या केवळ स्वयंपूर्ण झाल्या नाहीत, तर त्यांनी संपूर्ण परिसरासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com