पोलिसांची माणुसकी! अंधश्रध्देला कंटाळून घर सोडणाऱ्या तरुणीला भेटवलं 'आई'शी

police good worked
police good worked

पाचोड (औरंगाबाद): आपले कुटंबीय अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे पाहून घरातील अठरा वर्षीय युवती रागाच्या भरात गाव सोडून जात होती. पण ही बाब बस चालक व वाहक यांनी मुलीला पाचोड (ता.पैठण) पोलीस ठाण्यात आणून पोलिसांवर जबाबदारी सोपविली. पोलिसांनी खाकीपेक्षा मोठी असलेली आपली माणुसकी दाखवत तिच्या पालकांस बोलावून मुलीसह त्यांचे मनपरिवर्तन घडवून तिला पालकाच्या स्वाधीन केल्याची घटना पाचोड (ता.पैठण) येथे शनिवारी तारीख (ता.१६) सकाळी घडली.

अधिक माहिती अशी पैठण येथील एक बारावीत शिक्षण घेणारी वर्षीय युवती तिचे वडील जालना येथील रामनगर या गावी राहतात. तर आई पैठण येथेच असून आपणांस भूतप्रेताची बाधा झाल्याचे समजून आपल्यावर दोरीगंडा व लिंबूचा प्रयोग करण्यासोबतच जबरदस्तीने औरंगाबादच्या मनोरुग्णालयात नेणार असल्याने तिने आपल्यावर होत असलेल्या गैरसमजुतीच्या प्रकारातून कंटाळून शनिवारी सकाळी कुणालाही एक न सांगता घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ती सकाळी नऊ वाजता पैठण बसस्थानकावर जालनासाठी जाणाऱ्या बस (क्रमांक एम एच २०-३८४३)  पैठण - जालनामध्ये बसली.

सदर बस पैठण पासून दहा- पंधरा किलोमीटर अंतरावर आल्यानंतर जेव्हा महिला असलेल्या वाहक वैशाली वाघमारे ह्यांनी तिच्याकडे तिकीटाची विचारणा केली असता 'त्या' मुलीने आपल्याकडे तिकीटासाठी पैसे नसल्याचे सांगितले. तारुण्यात आलेली मुलगी सोबत कुणी नसताना एकटी - दुकटी तिकिटाला पैसे नसताना बसमध्ये प्रवास करते ही बाब वाहक वैशाली वाघमारे व चालक अरुण केदार यांना खटकली. त्यांनी त्या मुलीला स्वखिशातुन साठ रुपये टाकून तिचे तिकीट घेतले. त्यांनी 'त्या' मुलीस बसच्या खाली उतरून न देता माणुसकी धर्म जोपासत बस सरळ पाचोड पोलीस ठाण्यात आणली.

एकीकडे प्रवाशांची पुढे निघण्यासाठी चाललेली घाई व दुसरीकडे मुलीच्या संरक्षणाची चिंता या द्विविधा अवस्थेत त्यांचा कोंडमारा सुरु झाला. या घटनेची कैफियत पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी ऐकून घेतली. त्यांनी घटनेचे गांभीर्य पाहुन वाहक- चालका चे जवाब नोंदवून मुलीस बोलते करून तिच्याकडून पालकांचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्या आईस पाचोडला बोलविले. सविस्तर माहिती घेतल्यानंतर वाहक व चालकास पुढील प्रवासाला जाण्याची परवानगी दिली.

तासभर प्रवाशी या मुलींच्या प्रकरणामुळे गोंधळले गेले. मात्र बसला पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात येताच त्यांना हायसे वाटले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी त्या मुलीस भुक लागल्याने फेरोझ बर्डे व महिला पोलीस कर्मचारी शेख समिना यांना सांगून त्यास जेवण दिले. आई वडिलांस त्यांचे कर्तव्य, जबाबदारी समजावून सांगितली.

आता तिला आईवडिलांचे प्रेम देऊन तिला अंधश्रद्धा व तणावापासून दूर ठेवा, तीला शिक्षणाची आवड आहे,  तिला शिकून द्या, अंधश्रद्धा व वाईट व्यसनापासून स्वतःलाही दूर ठेवा असा सल्ला दिला. तर मुलीचेही मनपरिवर्तन घडवले. त्यानंतर आता असं काही होणार नाही असा तिला दिलासा देत 'त्या' मुलीला आईच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घडवून आणलेल्या आई -मुलींच्या मनोमिलनाचे सर्वत्र कौतुक होत असून प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी खाकीपेक्षा माणुसकी दाखवल्यास दगडालाही पाझर फुटतो हे जिवंत येथे पाहवयास मिळाले.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास मायलेकीस पैठणला रवाना केले. पोलीसांनी केलेल्या समुपदेशातून मायलेकीचे गैरसमज दूर त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. दोघींनी एकमेकींच्या गळ्यात पडून मायेचा हंबरडा फोडला. चात्यांनी पोलीसांसह एस.टी. महामंडळा च्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली सतर्कता व पोलिसांनी घडवून आणलेले मनोमिलन या युवतीच्या जीवना ला कलाटणी देणारी ठरेल, यांत तिळमात्र शंका नाही.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com