'ये तो किस्मत है भाई...' पोटाची खळगी भरण्यासाठी स्मशानातील राखेतुन सोनं शोधण्याची धडपड

अविनाश काळे
Sunday, 17 January 2021

दुकानदार जमा केलेला कचरा रस्त्याच्याकडेच्या नालीत टाकतात. त्यातील सूक्ष्म कण नालीत पडतात...

उमरगा (उस्मानाबाद):  सोन्यांचे दर गगनाला भिडलेले असताना अंगावर लाखो रुपये किंमतीचे दागिने घालून मिरवणारा उच्चभ्रू समाज. तर दुसरीकडे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नाना प्रकारचे काम करणाऱ्या फिरस्ती समाजाची होणारी अवहेलना सामाजिक विषमतेची दरीचे वास्तव चित्रण मन हेलावून टाकणारे आहे. दरम्यान कोरोना, ह्ययविकार असेल अथवा विविध आजाराने मागील आठ महिन्यांत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

प्रेताच्या तोंडात सोन्याचा सुक्ष्म तुकडा टाकण्याची प्रथा असल्याने स्मशानभूमीत दहन झाल्यानंतर उरलेल्या राखेतुन सोन्याचा छरा शोधण्यासाठी भटक्या समाजातील पती - पत्नीच्या धडपडीचे चित्र रविवारी (ता.१७) शहरातील हुतात्मा स्मारकाजवळील सार्वजनिक स्मशानभूमित दिसून आले.

नवरा-भावजयीच्या अनैतिक संबंधाला विरोध, बायकोला गमवावा लागला जीव

दिपावली असो की मकर संक्रांतीचा सण, या दरम्यान सोनं- चांदीच्या दागिन्यांची लाखो रुपयाची उलाढाल होते. शहरातील सराफ लाईन मोठी आहे, येथे विविध प्रकारचे दागिने तयार केले जातात. दागिने तयार करताना अगदी सूक्ष्म कण, किस इतरत्र पडतात.

दुकानदार जमा केलेला कचरा रस्त्याच्याकडेच्या नालीत टाकतात. त्यातील सूक्ष्म कण नालीत पडतात, त्या घाण पाण्यातून सोन्याचे सूक्ष्म कण शोधण्याचा प्रयत्न भटका समाज करतो. पहाटे साडेपाचपासून जहिराबाद येथील एक कुटुंब नालीच्या घाणीतुन दागिण्याचा किस शोधून पोटाच्या खळगी भरण्याचे स्वप्न पाहत असल्याचे विदारक चित्र सराफ लाईनमध्ये अधून - मधुन दिसून येते. हे चित्र पाहुन सामाजिक विषमतेची दरी काही केल्या कमी होत नाही. भटक्या विमूक्त समाजाला समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत असला तरी त्याला व्यापक स्वरूप प्राप्त होत नाही.

अजूनही हजारो कुटुंबं आकाशाला छप्पर समजून नैसर्गिक ऋतूचा सामना करत पालावरचं जगणं जगताहेत. समाजातील अनेक चिमूकल्यांना दहा - वीस रूपयांसाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील भंगार, प्लास्टीकच्या बाटल्या जमा कराव्या लागताहेत. भटक्यांना उदरनिर्वाहासाठी नानातऱ्हेच्या उपाययोजना करून फिरवे लागते. कधी बहुरूपीच्या वेशात तर कधी उघडपणे भिक मागावी लागते.

पहिल्या दिवशी ६३ टक्के लसीकरण, लातूर जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद

प्रेताच्या राखेतून सोनं शोधण्याचा केविलवाला प्रयत्न !

जहिराबाद (तेलंगणा) येथील चंदू नर्सिम्मा मसनजोगी यांच्या कुटुंबाचे गेल्या एक महिन्यापासून उमरग्यात मूक्काम आहे. शहरातील सराफ लाईनमधील नालीतून तो शंभर, दोनशे रुपये किंमतीचे सोने - चांदीचे सूक्ष्म कण शोधतात. तेथे काही मिळत नसल्याने हताश होऊन स्मशानात जातात. प्रेताचे दहन झाल्यानंतर शिल्लक राहिलेली राख जमा करुन ती बाजूच्या नालीच्या पाण्यातून बाजूला केली जाते. चंदू व त्याची पत्नी या कामासाठी रविवारी सकाळी दोन तास स्मशानभूमीत होते.

चाळणी करुन अगदी अर्धा गुंजाचा सूक्ष्म तुकडा त्याच्या हाती लागला. त्याच्या विक्रीतून मिळाले अवघे दोनशे रुपये. दरम्यान  सुस्तावलेल्या राज्यकर्त्यांना भटक्या समाजाविषयी कधी अस्था येईल आणि भटक्यांना  समाजाच्या मुख्य प्रवाहात कधी आणता येईल. याची प्रतिक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

लोकनेते विलासरावांचे पाय जिथे लागले तिथल्या शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे, अमित देशमुखांची भावनिक साद

ये तो किस्मत है भाई ....

उदरनिर्वाहासाठी आलेल्या चंदूच्या बोलण्यात नशीबाला आलेल्या जगणं बरच कांही सांगून जात होत. अनेक वर्षापासुन आमचं जगण्याचं साधनच झाल आहे. सोन्यांच्या दागिन्याचा पेहरावाचा आम्हाला हेवा वाटत नाही ... आमच्यासाठी स्मशान, नाली हेच आमचं जगण्याचे स्त्रोत. स्मशानातील राखेतून दोन दिवसांपूर्वी सोन्याच्या कणाने आठशे रुपये मिळवून दिले. प्रत्येक वेळी तेही नशीबांनं मिळालं तर खर ...  अशी भावनिक प्रतिक्रीया चंदू यांनी व्यक्त केली.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: umarga news usmanabad family Struggling to find gold in the ashes cemetery for living