Sambhajinagar Crime News
esakal
पडेगाव परिसर : एका वीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार (Padegaon Case) केला. यात पीडिता गर्भवतीही राहिली. तिची रविवारी (ता.१२) प्रसूतीही झाली. यानंतर याप्रकरणी तरुणावर छावणी पोलिस ठाण्यात (Police Station) गुन्हा नोंद केला आहे. सागर दिलीप बेलकर (वय २५, रा. शिवपुरी कॉलनी, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे.