गणपतीचा सण तीस पर्यंत पाढे म्हण

गणपतीचा सण तीस पर्यंत पाढे म्हण
Published on: 
पाढ्यांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची गणिती झेप! तळणीच्या जिल्हा परिषद शाळेत ४० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग तळणी, ता. ३ (बातमीदार) : तळणी (ता. मंठा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नूतन वसाहत येथे गणेशोत्सवाच्या काळात ‘गणपतीचा सण आणि ३० पर्यंत पाढे म्हण’ हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना नुकतेच पारितोषिक वितरण करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमात ४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचे पाढ्यांचे पाठांतर, गणितीय अचूकता, जलद गणना आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. इयत्ता तिसरीमध्ये प्रतीक प्रकाश मस्के याने प्रथम, राजवीर भागवत गुजर याने द्वितीय, तर विराज शालिग्राम कुकडे याने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता चौथीमध्ये अंजली प्रकाश सदावर्ते व रुद्राक्ष रवींद्र गवते यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळविला. सार्थक राजू ढवळे याने द्वितीय, तर स्वराज शालिग्राम कुकडे याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना स्टडी टेबल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त माजी सैनिक हरिदास सोनुने, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शिवशर्मा सोनुने, शिवाजी सदावर्ते, राहुल भडदम, शालिग्राम कुकडे, सर्व अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक रंगनाथ खंदारे तसेच एस. पी. जागृत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com