

Bidkin police arrest 3 male suspects and seize weapons, motorcycles, and cash while 3 female accomplices escape
Sakal
रविंद्र गायकवाड
बिडकीन : औद्योगिक वसाहत परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बिडकीन पोलिसांनी मध्यरात्री थरारक पाठलाग करत जेरबंद केले. DMIC परिसरातील C-10 / D-10 चौकाजवळ पैठण–निलजगाव मार्गावर वाहनांना अडवून दरोडा टाकण्याची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली. याबाबतीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री १०.३० वाजता सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके व पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील सह पथक गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीनुसार रात्री १०.५० वाजता पथक DMIC परिसरात दाखल झाले.