
Jayakwadi Dam
sakal
पैठण : जायकवाडी धरणातून रविवारी (ता. २८) मोठ्या जलविसर्गामुळे गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले. पुराचे पाणी शहरात शिरल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. आता पुराच्या विळख्यात शहर अडकले जाते की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात घर करून राहिली होती. मात्र, धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने पैठणकरांचा जीव भांड्यात पडला.