पैठण: औद्योगिकीकरणाच्या वाढत्या विस्तारामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना पैठण औद्योगिक क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणावर हरित क्रांती घडवून आणण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. .सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकारातून पैठण औद्योगिक क्षेत्रातील तब्बल एक लाख ४९ हजार ३७७ चौ.मी. मोकळी जागा वृक्षलागवडीसाठी पैठण औद्योगिक वसाहतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई यांनी उपलब्ध करून दिली आहे..Akola News: ‘सकाळ’ वऱ्हाड आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त;अकोल्यात रंगणार ‘केतकी’च्या सुरांची अविस्मरणीय मैफल.सामाजिक वनीकरण विभाग, पैठण यांनी २०२६ च्या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत पैठण औद्योगिक क्षेत्रातील उपलब्ध मोकळ्या जागा वृक्षलागवडीसाठी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला. उपअभियंता, भूमापक आणि नियोजन विभागाने केलेल्या तपासणीनंतर अनेक भूखंडांवर वृक्षलागवड शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे..यात खुली जागा क्रमांक ७, ८, १६, १७, १, ६, १३ आणि ९ या भूखंडांचा समावेश आहे. या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, बागबगीचे, सुशोभीकरण आणि पर्यावरण संवर्धनाची कामे करण्याचा मानस आहे. प्रस्तावासाठी शासनाच्या ३१ जानेवारी २००८ व २६ नोव्हेंबर २००८ च्या परिपत्रकांचा आधार घेण्यात आला आहे..औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या जागांचा उपयोग वृक्षलागवड, बागबगीचा आणि सुशोभीकरणासाठी करता येऊ शकतो, असे परिपत्रकात नमूद असल्याने प्रस्तावाला कायदेशीर आणि प्रशासकीय आधार मिळाला आहे..Premium|Apple Inc Leadership Change 2026 : निरोप 'ऑपरेशन गाय'चा! ॲपलमध्ये १५ वर्षांनंतर मोठे फेरबदल; टीम कूक यांच्यानंतर कोणाकडे धुरा?.दरम्यान, या प्रस्तावावर विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या व निरीक्षणे नोंदविलेली असून, मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे. पैठण औद्योगिक क्षेत्रात हजारो झाडांची लागवड झाल्यास भविष्यात हे क्षेत्र केवळ औद्योगिक केंद्र न राहता पर्यावरणपूरक आणि हिरवेगार औद्योगिक पट्टा म्हणून ओळखले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.."पैठण औद्योगिक वसाहत क्षेत्रात वृक्षलागवड होत असल्यामुळे नागरिकांना व कामगारांना पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होणार आहे."- नितीन जाधव, उपअभियंता, मऔविम, छत्रपती संभाजीनगर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.