पैठण : बाजार समितीवर प्रशासक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paithan Market Committee

पैठण : बाजार समितीवर प्रशासक

पैठण : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यामुळे २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक होईपर्यंत पैठण बाजार समितीवर प्रशासकपदी तालुका खुलताबाद येथील सहायक निबंधक डॉ.आम्रपाली काशीकर यांची जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.

यंदाची ही निवडणूक प्रचलित पद्धतीने म्हणजेच १८ संचालक पदासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपून वर्ष उलटले तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नव्हता. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीचा कालावधी १९ सप्टेंबरला संपला आहे. त्यामुळे नव्याने प्रशासक पदाची नियुक्ती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. साधारणपणे बाजार समित्यांच्या मतदार यादीचा कार्यक्रम ८ ते १० दिवसांचा असतो. यावेळी प्राधिकरणाने तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी जाहीर केला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे संबंधित बाजार समिती व पंचायत समित्यांना याद्या मागविल्यानंतर प्रारूप यादी, त्यावर आक्षेप, सुनावणी व अंतिम यादी ही प्रक्रिया फार तर दोन आठवड्यांत केली जात असते. या प्रदीर्घ कालावधीबद्दल सहकार क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ.पी.एल. खंडागळे यांनी ६ सप्टेंबर २०२२ च्या आदेशान्वये मुदत संपलेल्या बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २३ डिसेंबर २०२२ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, २३ ते २९ डिसेंबर दरम्यान अर्ज भरणे, ३० डिसेंबर रोजी छाननी, २ ते १६ जानेवारी २०२३ रोजी अर्ज माघारी घेणे, १७ जानेवारी रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर व चिन्ह वाटप तर २९ रोजी मतदान तर ३० जानेवारी २०१३ रोजी निकाल जाहीर होणार आहे.

असे आहे संचालक मंडळ

विविध विकास सेवा सोसायटी ११

ग्रामपंचायत ४

व्यापारी २

हमाल मापाडी १

एकूण १८

Web Title: Paithan Market Committee Administrator

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..