

Paithan Toilet Vandalism
esakal
पैठण: जनतेच्या घामाचा पैसा कसा पाण्यात घालावा, याचे उदाहरण पैठण नगरपालिकेने दाखवून दिले आहे. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी तब्बल ७० लाख रुपये खर्चून उभारलेली अत्याधुनिक स्वच्छतागृहे गेल्या वर्षभरापासून केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळखात पडून आहेत. प्रशासनाची बेपर्वाई आणि लोकप्रतिनिधींच्या ‘रिबिन कापण्याच्या’ हव्यासापायी या प्रकल्पाचे लोकार्पण होण्यापूर्वीच अज्ञातांकडून तोडफोड सुरू झाली आहे. यामुळे करदात्यांच्या पैशांचा अक्षरशः चुराडा होत आहे.