

Chhatrapati Sambhajinagar
esakal
जायकवाडी: मराठवाड्याचे प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाणारे पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान सध्या प्रशासकीय अनास्था आणि देखभालीच्या अभावामुळे समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. ३१० एकर विस्तीर्ण क्षेत्र आणि ७२ एकरवरील मुख्य फुलझाडांचे उद्यान हे पर्यटकांचे आकर्षण आहे. मात्र, सध्या या उद्यानाचे सौंदर्य शेवाळ आणि अस्वच्छतेमुळे धोक्यात आले आहे.